
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील कमतनूर वेसची डागडुजी कधी करणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. संकेश्वरातील आदिलशाही इतिहासाची आठवण करुन देणाऱ्या कमानी लूप्त पावल्या आहेत. संकेश्वरातील दोन वेसींचे महत्व कायम स्वरुपी टिकवून ठेवण्याचे कार्य केले जात आहे. संकेश्वरातील प्रमुख कमतनूर वेसीचा ढाचा निखळून पडण्याच्या स्थितीत दिसतो आहे. कमतनूर वेसीवर संकेश्वरचे ग्रामदैवत श्री शंकरलिंग देवाची पिंडी ठेवण्यात आली आहे. पिंडीचा कांहीं भाग भग्न पावला आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कमतनूर वेसची डागडुजी करण्याबरोबरच वेसीवर ठेवणेत आलेल्या श्री शंकरलिंग पिंडीची दुरुस्ती करण्याची मागणी भक्तगणांतून केली जात आहे.
श्री शंकरलिंग पिंडीची पूजाअर्चा..
कमतनूर वेसीवर ठेवणेत आलेल्या श्री शंकरलिंग देवाच्या पिंडीची पूजाअर्चा करता येण्यासाठी कमतनूर वेसीला जिना (शिडी) करण्याची आवश्यकता असल्याचे लोकांतून सांगितले जात आहे.संकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद यांनी ताबडतोब यांची दखल घेऊन कमतनूर वेस दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी लोकांतून केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta