
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कोकणची काळीमैना (करवंदे) दाखल झाले आहेत. करवंदे थोडेसे महाग झालेले असले तरी लोक ते खरेदी करुन राणमेव्याचा आस्वाद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी पाच रुपयाला मिळणारे करवंदे यंदा दहा रुपयाला आणि दहा रुपयांचे करवंदे पंधरा रुपयाला विकत दिले जाताहेत. संकेश्वर बाजारात मोसमी फळातील आंबे, काजू, कलिंगड, केंव्हाच दाखल झाले असून आता करवंदे दाखल झाले आहेत. पूर्वी गल्लोगल्लीत करवंदे विक्रीसाठी येणाऱ्या महिला काळीमैनाची आरोळी देत करवंदे विक्री करायचे. आज जमाना बदलला आहे. काळीमैना खरेदीसाठी लोकांना बसस्टँड गाठावे लागत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta