
हुक्केरी : हुक्केरी मतदारसंघात पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि लघु पाटबंधारे खात्याच्या योजना समर्पकपणे राबविण्यात येत असल्याची माहिती वन तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते आज, रविवारी लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने जाबापूर, हुल्लोळीहट्टी, अलूर के. एम., सोलापूर, होन्नीहळ्ळी गावात लहान बंधारे दुरुस्ती योजनांना तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून एलीमुन्नोळी, केसती, हरगापूर, हिटणी, सिंदीहट्टी गावात रस्ताकामांना चालना देण्यात आली. यावेळी लघु पाटबंधारे खात्याचे अभियंता संजय माळगे यांनी मंत्री कत्ती यांना या कामांची तांत्रिक माहिती दिली. आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उमेश कत्ती यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री कत्ती म्हणाले, हुक्केरी मतदारसंघात पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि लघु पाटबंधारे खात्याच्या योजना समर्पकपणे राबविण्यात येत आहेत. सुमारे 7 कोटी रुपये खर्चातून करावयाच्या कामांना आज चालना दिली आहे. यातून पंतप्रधानांचे ग्राम सुधारणांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हीरा शुगर, अशोक पट्टणशेट्टी, हुकेरी नगरपरिषदेचे अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, सदस्य राजू मुनोळी, सिद्धू हल्लिंगळी, महांतेश तळवार, मिर्झा मोमिन, गिरीश कुलकर्णी, कंत्राटदार मल्लाप्पा बिसिरोट्टी, प्रसाद खाडे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta