Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात बसवज्योतीचे जंगी स्वागत..

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बसवप्रेमींनी विविध देवस्थान येथून धावत आणलेल्या पाच बसवज्योतीचे जंगी स्वागत करण्यात आले. बसवज्योतीचे पालिकेत आगमन झालेनंतर नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव यांनी बसवज्योतला पुष्पहार घालून सहर्ष स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक संजय शिरकोळी, चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, विनोद नाईक, रोहण नेसरी गंगाराम भूसगोळ, प्रमोद होसमनी, राजेंद्र बोरगांवी, कुमार कब्बूरी, सागर कर्देण्णावर, सदा कब्बूरी, मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद अनेक मान्यवर उपस्थित होते. बसव सर्कल येथे बसवेश्वर महाराज की जय, अशा जयजयकारात बसवज्योतीचे स्वागत करण्यात आले. येथे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, प्रदीप माणगांवी, उमेश फडी, बबलू मुडशी, चेतन बशेट्टी, आनंद संसुध्दी, प्रशांत कोळी, शुभम बागलकोटी, मंजुनाथ नाशीपुडी, प्रदीप कर्देगौडा बसवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. होसपेटी बसवेश्वर युवक मंडळाच्या सदस्यांनी धावत अत्याळ रामलिंगेश्वर येथून बसवज्योत आणली. पाटील गल्लीतील युवकांनी उळवी चन्नबसवेश्वर, कुंभार गल्ली (मंजुनाथ मुरडेश्वर) कब्बूरी चाळ (घटगी बसवान मंदिर चिकोडी) येथून धावत बसवज्योत आणली आहे. गावातील प्रमुख मार्गे बसवज्योतीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
बसवजयंती साजरी..


येथील बसवान गल्लीतील श्री बसवेश्वर मंदिरात सकाळी बसवेश्वराला अभिषेक, महापूजा करण्यात आली. महिलांनी पाळा गीत गात श्री बसवेश्वरांचा जन्मकाळ साजरा केला. महिलांचा ओटी भरणेचा कार्यक्रम पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *