Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात शिवबसव जयंतीतून एकात्मतेचे दर्शन..

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्रची नमाज पठन करुन शिवबसव जयंतीतून आपला सहभाग दर्शविला. मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर पुतळ्याला, प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंदू समाज बांधवांना शिवबसव जयंतीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. हिंन्दू बांधवांनी मुस्लिमांना अलिंगल देत रमजान ईदच्या शुभेच्छा प्रदान केल्या. त्यामुळे संकेश्वरात शिवबसव जयंती उत्सवात हिंन्दू-मुस्लिम बांधवात भाईचारा प्रकर्षाने दिसून आला. येथील हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिवबसव जयंतीच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शन घडविले.

बसव सर्कल येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याला मुस्लिमांनी प्रथम पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तदनंतर शिवाजी चौक येथील शिवबसव प्रतिमेला पुष्पहार घालून समस्त हिंदू बांधवांना शिवबसव जयंतीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, अविनाश नलवडे, सुनिल पाटील, अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकानदार, दस्तगीर तेरणी, रियाज फणीबंद, इरफान तेरणी, मुसिफ नदाफ, झुल्फिकार कलादगी, अकबर जमादार, मिरा मकानदार, साहील शेख हिंदू -मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *