Saturday , October 19 2024
Breaking News

कर्नाटकात मुख्यमंत्री बदल नाही : उमेश कत्ती

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) :राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना बदलणेचा प्रश्नच उदभंवत नसल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितले. ते संकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात सहभागी होऊन पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी वर्षभरात चांगली कामगिरी करुन दाखविली आहे. त्यांच्या नेतृत्वावर भाजपाच्या सर्व आमदारांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री राज्याचा सर्वांगिण विकास साधण्याचे कार्य करताहेत. त्याचप्रमाणे राज्यातील जनता देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या कामगिरीवर खूष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलणेचा विषय नाही. पक्षातील कांहीं असंतुष्ट आमदार बसवराज बोम्माई यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. कांहींनी मुख्यमंत्री बदलीचा विषय उचलून धरला आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते असंतुष्ट आमदारांशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढतील पण मुख्यमंत्री बदलणार नाहीत. भाजपाचे राष्ट्रीय सचिव संतोष बी.एल. यांच्या स्टेटमेंटचा अर्थ वेगळा काढला जात आहे. त्यांनी सांगितले काय आणि त्यांच्यावीषयी सांगितले जात आहे काय? याविषयी भाजपा हायकमाड गांभीर्याने विचार करत आहे. संतोष बी.एल. यांनी निष्क्रिय आमदार आणि मंत्री यांच्याविषयी वक्तव्य केले आहे.त्यांनी मुख्यमंत्री बदलीचा विषय कोठेच सांगितलेला नाही. कर्नाटक राज्यातील राजकीय घडामोडींवर भाजपा हायकमांड बारीक लक्ष ठेवून आहे. पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांवर केंव्हांही कार्यवाही होऊ शकते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.त्यात कोणाची वर्णी लागणार हे कांहीं सांगता यायचे नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराज बोम्माई यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे राज्याला एक चांगला मुख्यमंत्री लाभला आहे. कोणी कांहीं सांगितले तरी सध्यातरी मुख्यमंत्री बदलीचा विषय नाही. राज्यातील विधानसभेची निवडणूक सात-आठ महिन्यांत होत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या १५० जागा भाजपा पटकावून परत राज्यात एकहाती सत्ता प्रस्थापित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, सचिन भोपळे, गंगाराम भूसगोळ, प्रमोद होसमनी, विवेक क्वळी, पुष्पराज माने, सुभाष कासारकर, अमोल गोंधळी, संदिप दवडते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *