
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे बसवराज ऊर्फ तात्या बागलकोटी यांचे नाव आघाडीवर दिसत आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी इच्छूक असले तरी भाजपा हायकमांडच्या यादीत बसवराज बागलकोटी यांचे नाव अग्रस्थानी असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. बसवराज बागलकोटी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दर्शविला तर रोहण नेसरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आखाड्यात मनध्वनीचा आवाज..
संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ ची पोटनिवडणूक दैनिक मनध्वनीचे संपादक मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी लढवावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांतून केली जात आहे. मंजुनाथ गड्डेण्णावर हे दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचे कार्य करतील अशी अपेक्षा लोकांतून व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संकट काळात आणि हिरण्यकेशी नदीला महापूर आलेल्या प्रसंगी मंजुनाथ यांनी केलेल्या समाजसेवेचे कार्य लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहीले आहे. मंजुनाथ यांनी शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य केले आहे. एक सच्चा समाजसेवक अशी मंजुनाथ गड्डेण्णावर यांची ओळख राहिली आहे. त्यांनी प्रभाग १३ ची निवडणूक लढविल्यास मतदारांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रभाग १३ घ्या निवडणुकीत मनध्वनीचा आवाज घुमणार असल्याची चर्चा केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta