
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी चौकात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्ताने शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना ॲड. विक्रम कर्निंग म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज हे खरे समाज सुधारक, शिक्षणप्रेमी होते. त्यांनी मागासवर्गीयांसाठी शिक्षणात सवलती मिळवून देऊन समाजाची उन्नती घडविण्याचे कार्य केले. गिरीश कुलकर्णी म्हणाले, रयतेचा राजा, शिवाजी महाराजांचा खरा वारसा छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यांनी मागासवर्गीयांच्या मुलांनासाठी शिक्षणाचे दालन खुले केले. मागसवर्गिय मुलांसाठी वसतीगृहे उभारण्याचे कार्य केले. त्यांनी आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने ते लोकराजा होते.
यावेळी सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, अविनाश नलवडे, राजेंद्र बोरगांवी, जयप्रकाश सावंत, अभिजीत कुरणकर, दीपक भिसे, पुष्पराज माने, संतोष कमनुरी, समीर पाटील, संदीप अटक, मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा मोरे, नेताजी आगम, अमोल गोंधळी, पिंटू कारेकर, सुखदेव मोकाशी, दत्ता शिंदे शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta