

संकेश्वर (महंमद मोमीन) : नुकतीच बसवजंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. बेल्लद बागेवाडी आणि हरगापूरगड येथील बसवजयंतीची चर्चा लोकांत चांगलीच रंगलेली दिसत आहे. बेल्लद बागेवाडीतील बसवजयंती मिरवणुकीत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सिनेगितांच्या तालावर देहभान विसरून केलेले नृत्य लोकांत चांगलेच चर्चेत दिसत आहे. रमेश कत्ती यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला मोबाईलवर बरेच चांगले काॅमेट देखील मिळताहेत. रमेश कत्तींच्या असंख्य अभिमानींनी आपल्या मोबाईल स्टेटसवर रमेश कत्ती यांच्या डान्स ठेवलेला दिसताहे. रमेश कत्ती यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारे असेच कांहीसे आहे. त्यामुळेच तर त्यांचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढतांना दिसताहे. रमेश कत्ती यांच्या डान्सने युवा वर्गात, छोट्या मुलांत मोठा उत्साह निर्माण झालेला दिसत आहे.
राजेंद्र पाटील यांचं ढोलकी वादन
संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हे शिस्तबद्धतेला महत्व देणारं असल्याने त्यांच्याविषयी युवावर्गात नेहमीच आदरभाव राहिला आहे. हरगापूरगड येथील बसवजयंती उत्सवात राजेंद्र पाटील यांनी चक्क हातात ढोलकी घेऊन ठेका धरल्याने गडवासिय अचंबित होऊन पहातच राहिले. राजेंद्र पाटील यांनी जयंती उत्सवात अभंगाला ढोलकीची साथ दिलेला व्हिडिओ मोबाईलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांचे चहाते समर्थक राजेंद्र पाटील यांच्या ढोलकी वादनावर फिदा झालेले दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta