Monday , December 8 2025
Breaking News

संकेश्वर प्रभाग १३ निवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर. व्ही. ताळूर यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काॅंग्रेस, भाजपा उमेदवारांनी शक्ती प्रर्दशनाने अर्ज दाखल केले. काॅंग्रेसपक्षातर्फे ॲड. प्रविण एस. नेसरी, अप्पासाहेब पचंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, बसनगौडा पाटील, प्रकाश नेसरी, शिवकुमार नष्टी, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, दिलीप होसमनी, महेश हट्टीहोळी, मुक्तार नदाफ, सुभाष कासारकर, झाकीर मोमीन, मुस्तफा मकांनदार, बापू पोतदार, अल्ताफ शाहेण्णावर, रेजा सोलापूरकर, शिव मुंजण्णावर, संतोष सत्यनाईक कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीतर्फे एपीएमसी संचालक, व्यापारी शिवानंद उर्फ नंदू मुडशी, सरकार नियुक्त नगरसेवक रोहण नेसरी, प्रविण नष्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, शंकरराव हेगडे, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ सचिन भोपळे, डॉ. मंदार हावळ, विवेक क्वळी, महेश देसाई, नागेश क्वळी, राजेंद्र बोरगांवी, किरण नेसरी, अभिजित कुरणकर, संतोष कमनुरी, राजू गडकरी, संदिप गंजी, सागर क्वळी, गंगाधर पट्टणशेट्टी, कल्याणकुमार निलाज, महेश नेसरी, किरण खटावकर, जयकुमार पाटील, चेतन बशेट्टी, सागर जकाते, दादासाहेब बेविनकट्टी, संदिप दवडते, सोनू बेळवी, प्रदीप माणगांवी, सचिन सपाटे, चरण खटावकर कार्यकर्ते उपस्थित होते.
निधर्मी जनता दलाच्यावतीने शिवानंद समकण्णावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासमवेत रमेश बुदगोळ, परशराम कोळी, सुरेश नेमानी हजर होते. उद्या मंगळवार दि. १० रोजी उमेदवार अर्जाची छाननी होणार असून गुरुवार दि. १२ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *