संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी ठाम असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, प्रभाग 13 मध्येच मी लहानाचा मोठा झालो आहे. येथील सुभाष रस्ता बाजारपेठेत आमच्या परिवाराच्या तीन पिढ्यांनी कडधान्य व्यापार करुन जीवनाचा गाडा चालविला. त्यामुळे आपण प्रभागाशी ऋणानुबंध आहोत. प्रभागाला आपण कांही तरी नव्हे तर बरेच कांही देणे लागतो. याची जाणीव आपणाला आहे. प्रभागाचा सर्वांगिण विकास हेच आपले ध्येय राहणार आहे. प्रभागाच्या विकासासाठी झटणारे माझे परममित्र, धडाडीचे दिवंगत नगरसेवक संजय नष्टी यांच्या कार्याचा वारसा आपण नेटाने पुढे चालवून दाखविणार आहोत. आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती यांचं बहुमोल मार्गदर्शन आणि आशीर्वादाने आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. त्यांचा आशीर्वाद हिच आपली प्रेरणाशक्ती राहिली आहे. प्रभागातील सर्व समस्या मार्गी लावून स्वच्छ सुंदर वार्ड बनविण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करुन दाखविणार आहोत. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहे. प्रभागातील नागरिक आणि महिलांकडून समस्या जाणून घेऊन समस्या मार्गी लावण्याचे काम आपण करुन दाखविणार आहे. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्याबरोबर येथील छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाशी चर्चा करुण सुभाष रस्ता बाजारपेठेला गतवैभव मिळवून देण्याचे कार्य आपण निश्चितपणे करणार आहे. प्रभागातील लोकांची शासकीय कामे करुन देण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणार आहे. त्यामुळे प्रभागातील लोकांना घरबसल्या शासकीय कामे करुन घेता येणार आहेत. गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य लोकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत, युवकांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य करताना महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ मिळवून देण्याची आपण योजना आखली आहे. प्रभागातील लोकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. प्रभाग 13 च्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी लोकांचा आशीर्वाद आपणाला हवा असल्याचे त्यांनी सांगितले.
Check Also
संकेश्वर नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी!
Spread the love संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेसाठी नुकताच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सरकारने आरक्षण जाहीर केले …