Thursday , September 19 2024
Breaking News

हुक्केरी पिता-पुत्र आमदार …

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव जिल्ह्यात आता हुक्केरी कुटुंबाने देखील नविन इतिहास रचलेला दिसत आहे. हुक्केरी कुटुंबातील बाप-लेक आमदार होण्याचा मान पटकाविणारे ठरले आहेत. बाप प्रकाश बी. हुक्केरी हे विधान परिषदेत शिक्षक प्रतिनिधी म्हणून तर मुलगा (लेक) गणेश पी. हुक्केरी हे चिकोडी-सदलगा मतक्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून सेवा बजाविणार आहेत. बेळगांव जिल्ह्यातील राजकारणात अनेकांनी नवीन इतिहास रचनेचे कार्य करुन दाखविले आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बी. शंकरानंद यांनी चिकोडी राखीव लोकसभा मतदारसंघातून सातत्याने सात वेळा निवडून जावून गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदविण्याचे कार्य केले. राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे बेळगांव जिल्ह्यातील हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून सातत्याने आठ वेळा निवडून येऊन सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा मान पटकाविला आहे. कत्ती कुटुंबात एकाच वेळी खासदार-आमदार होण्याची घटना नवीन इतिहास रचनारी ठरली होती. मोठे बंधू उमेश कत्ती आमदार तर धाकटे बंधू रमेश कत्ती खासदार झाले होते. जोल्ले कुटुंबाने कत्तींचा वारसा पुढे चालविलेला दिसत आहे. पतीपरमेश्वर अण्णासाहेब जोल्ले खासदार असून त्यांच्या पत्नी सौ. शशीकला जोल्ले मंत्रिपदाची धुरा सांभाळीत आहेत. जारकीहोळी बंधुंनी तर नवीन इतिहास रचला आहे. एकाच जारकीहोळी कुटुंबातील चौघे बंधू आमदार म्हणून कार्यरत आहेत. रमेश जारकीहोळी (गोकाक विधानसभा मतक्षेत्र), भालचंद्र जारकीहोळी (आरभावी विधानसभा मतदारसंघ), सतीश जारकीहोळी (यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघ), लखन जारकीहोळी (अपक्ष विधानपरिषद सदस्य) आहेत. एकाच कुटुंबातील चौघे बंधू आमदार म्हणून सेवा बजावित आहेत. पती-पत्नी खासदार होण्याचा मान अंगडी कुटुंबाने मिळविला आहे. माजी खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा वारसा खासदार श्रीमती मंगला अंगडी चालवित आहेत. बेळगांव जिल्ह्यातील राजकारणात नवीन इतिहास रचणाऱ्या कुटुंबाने चांगल्या कामगिरींने जनमाणसात मोठी लोकप्रियता देखील मिळविलेली दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *