संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-हुक्केरी हाॅटेल ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची नुकतीच सभा घेऊन त्यात सर्वानुमते कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी हाॅटेल शांतीसागरचे मालक सुधाकर नारायण शेट्टी, उपाध्यक्षपदी रेणुका हाॅटेलचे मालक रामचंद्र सिद्राम भोसले निवडले गेले आहेत. हाॅटेल संघटनेचे सचिव म्हणून संतोष शामराव पाटील, खजिनदार राघवेंद्र मल्हारी देशपांडे तर संचालक मंडळात प्रताप शेट्टी, देवीप्रसाद शेट्टी, दावलमलिक नाईकवाडी, उदय शेट्टी, सुखांत बांबरे, महेश शेंडे, प्रविण धबाले यांची वर्णी लागली आहे.
हाॅटेल संघटनेचे नूतन अध्यक्ष सुधाकर शेट्टी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, आम्ही संकेश्वर-हुक्केरी येथील हाॅटेल मालक-चालक यांच्यात एकजूट निर्माण करण्यासाठी संघटना स्थापन केली आहे. हाॅटेल व्यवसायिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची आवश्यकता आहे. पण तसे कांहीच घडेनासे झाले आहे. हाॅटेल व्यवसाय चालविणे आता सोपे राहिलेले नाही. हाॅटेल व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. सरकारने किमान हाॅटेल व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्याचे कार्य करायला हवे आहे. संघटनेची स्थापना करताना आम्ही प्रथम रितसर नोंदणी केली आहे. कर्नाटक शासनाच्या सहकार विभागाने आमच्या संघटनेला संकेश्वर-हुक्केरी हाॅटेल ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रमाणपत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta