
संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला एच.एल.एल. कंपनीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त पुंडलिक करिगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कणगला एच.एल.एल कंपनीत पुंडलिक करिगार हे ३५ वर्षे सिनियर बाॅयलर ऑपरेटर म्हणून सेवा बजावून निवृत झाले आहेत. सेवानिवृतीबद्दल पुंडलिक करिगार यांचा एच.एल.एल. कंपनीचे युनिट प्रमुख के.नरेश, एच.आर.चे विरेंद्र सर यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुंडलिक यांच्या कार्याची प्रशंसा केली. एच.एल.एल. कंपनीत पुंडलिक यांनी मेकॅनिकचे उत्कृष्ट काम केलेबदल त्यांना गुणवंत कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. त्याचबरोबर ते युनियनचे बेस्ट लिडर, उत्तम बाॅयलर ऑपरेटर म्हणून केलेल्या कार्याची मान्यवरांनी स्तुती केली. यावेळी कणगला लाईफ केअर, सीआरसी, ओआरसी, एचएलआरसी, एच.एल.एल. सोसायटी, एच आर युनियनतर्फे पुंडलिक करिगार यांना सेवानिवृत्तबदल सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. कवी पिराजी पाटील यांनी पुंडलिक करिगार यांच्या सामाजिक कार्याची, एच.एल.एल. मध्ये केलेल्या उत्तम कार्याची तोंडभरून प्रशांशा केली आहे. यावेळी कणगला एचएलएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta