Tuesday , March 3 2026
Breaking News

अन् हिरण्यकेशी उलटी वाहू लागली….

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-नांगनूर भागातील नागरिकांना आज प्रथमच आगळं-वेगळं असे कांहीतरी पहावयास मिळाले. हिरण्यकेशी नदीचा प्रवाह उलट्या दिशेने वाहताना दिसला. हे आगळे वेगळे अन् अफलातूनची करामत पहाण्यासाठी लोक भरपावसात गोटूर बांधाऱ्यावर जमा झालेले दिसले संकेश्वरात आज पाऊस बऱ्यापैकी कोसळला पण कमतनुरला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे कमतनूर ओढ्याच्या पाण्याने थेट गोटूर बांधारा गाठलेला दिसला. गोटूर बंधाऱ्याचे पाणी संकेश्वरच्या दिशेने वाहताना दिसले. हिरण्यकेशीची गंगा उलटी वाहू लागल्याचे समजताच लोक गोटूर बंधाऱ्यावर पोचले. उलटी गंगा वाहतानाचा आगळावेगळा अनुभव लोकांनी घेतला. संकेश्वर हिरण्यकेशी नदीचा प्रवाह हळ्ळी हिटणीकडून थोडाबहुत तर गोटूर बंधाऱ्याकडून उलटा प्रवाह जोरदार दिसला. गोटूर बंधाऱ्यातून आलेल्या उलट्या प्रवाहाने हिरण्यकेशी नदी पात्रात मोठी वाढ झालेली दिसत नाही.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *