Tuesday , March 3 2026
Breaking News

मल्लिकार्जुन सौहार्दतर्फे मुडशी-मुरगाली यांचा सत्कार

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री मल्लिकार्जुन अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी, बढती मिळविलेले अधिकारी रविंद्र मुरगाली यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. टी.एस. नेसरी, एम. जी. होसूर, प्रकाश कणगली, मल्लीकार्जुन सौहार्दाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी म्हणाले, नूतन नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी प्रभाग क्रमांक 13 मधील समस्या जाणून घेऊन सोडविण्याचे कार्य करायला हवे आहे. त्याचबरोबर संकेश्वरचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी अनेकविध योजना साकारण्याची गरज आहे. आमचे स्नेही रविंद्र मुरगाली हे एईई बढती अधिकारी म्हणून अथनी तालुक्यात सेवा बजाविणार आहेत. त्यांनी उत्तम कार्याने संकेश्वरचे नाव मोठे करावे असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी संकेश्वरात ब्लड बँक (रक्तपेढी) ची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सत्कार सोहळ्याला नगरसेवक डॉ. मंदार हावळ, डॉ. रमेश दोडभंगी, डॉ. विकास पाटील, डॉ. समीर मुल्ला, डॉ. आळतेकर, डॉ. जयप्रकाश करजगी, प्रशांत गडकरी, सुनिल ओतारी, सिध्दलिंगप्पा पट्टणशेट्टी, ॲड. संतोष पाटील, राम किल्लेदार, गोपी पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय अंगडी, उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी यांनी केले. आभार कल्पना मन्नीकेरी (सीईओ) यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *