
संकेश्वर (महंमद मोमीन) : योग-प्राणायमने मनशुध्दी करणे साध्य असल्याचे स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या कार्यदर्शी श्रीमती महादेवी पाटील यांनी सांगितले. संकेश्वर विश्व चेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या आवारात शालेय मुला-मुलींनी, शिक्षक-शिक्षिकांनी योग-प्राणायमाचा सराव केला.
महादेवी पाटील पुढे म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करताना शालेय मुलांना योग-प्राणायमचे महत्त्व समजावून सांगायला हवे आहे. शालेय मुलांची बुद्धी तल्लख करण्यासाठी योग-प्राणायम महत्वाचे असल्याचे सांगितले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी योगासनांचे महत्व मुलांना समजावून सांगितले. शाळेतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिन योग-प्राणायमाच्या सरावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षण संस्थेच्या संचालिका कु.सुष्मा पाटील, मुख्याध्यापक नवीन चौगला, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होऊन योगासनांचा अभ्यास केला.
Belgaum Varta Belgaum Varta