संकेश्वर (प्रतिनिधी) : निडसोसी रस्ता येथील रहिवासी संजय वेंकटेश थोरवत (वय ५५) याचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. याविषयी समजलेली माहिती अशी संजय थोरवत हा व्यसनाधीन होता. काल रात्री तो निडसोसी रस्ता लगत असलेल्या जाधव यांच्या विहिरीच्या कट्ट्यावर बसलेला असताना कलंडून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला शवविच्छेदनानंतर संजय याचे मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आले. संजय हा जैनापूर येथील ओम शुगर्स कारखान्यात बाॅयलर पदावर कार्यरत होता. भूसेनेतील जवान प्रमोद थोरवत यांचे ते वडील होत. पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. संकेश्वर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
