१०२ रुग्णांची तपासणी : सोमवारी मेंदू, मणक्यांसाठी शिबिर
निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे संस्थापक डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल मेडिकल रिसर्च सेंटर, बेळगाव, केएलई आरोग्य सेवा केंद्र आणि रोटरी क्लब निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत आरोग्य तपासणी शिबीरास रूग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोटरी क्लबच्या इमारतीत पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीरामध्ये १०२ रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले.
अमर बागेवाडी, रोटरी क्लब च अध्यक्ष सोमनाथ परमणे व पदाधिकारी, तज्ञ नेत्र डॉक्टरांच्या उपस्थितीत या शिबीरास सुरवात झाली. यामध्ये १०२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यातआले. यामध्ये ३८ महिला आणि ६४ पुरुषांचा समावेश होता. तर पुढील उपचारासाठी ६१ रुग्णांना सूचना करण्यात आल्या. यावेळी अमर बागेवाडी यांनी, केएलई आणि रोटरीच्या माध्यमातून निपाणी व परिसरात चांगली दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी. याकरीता तज्ञांच्या सहकार्यातून काम केले जात असून याचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सोमवारी (ता. २७) मेंदू व मणक्याच्या आजारावर मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटलचे तज्ञ डॉक्टर्स हजर राहणार असून याचा भागातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सचिन देशमाने, दिलीप पठाडे, आरोग्य समन्वयक संजय पाटील, आरोग्य स्वयंसेवक शंकर बोरगावे, चंद्रकांत पावले, बापूसाहेब वारके यांचीउपस्थिती होती. यावेळी उपस्थित रुग्णांनी सदर शिबीरामुळे नेत्र रोगांवर प्रभावीपणे व मोफत उपचार करण्यात येत असल्याबध्दल केएलई व रोटरी क्लबचे आभार मानले.
