Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरातून विठूरायाच्या नाम गजरात पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातून आज विठूरायाच्या नाम गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. संकेश्वरात कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे झाली पंढरपूर पायी वारीचे भाग्य वारकरींना लाभले नव्हते. यंदा मात्र विठ्ठलाच्या कृपेने वारकरींना पायी वारीचा योग लाभलेला दिसला. संकेश्वर येथे श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सुरू होऊन ४५ वर्षे झाली.पायी दिंडीमध्ये काकड आरती, भजन, हरीपाठ कार्यक्रम चालणार असून पायी दिंडी सोहळ्यात श्री राम वारकरी भजनी मंडळ नांगनूर तालुका गडहिंग्लज, अंकले भक्त मंडळींचा समावेश आहे. पायी दिंडी संकेश्वर येथून २८ जून २०२२ प्रस्थान होऊन सोमवार दि. ४ जुलै २०२२ रोजी सांगोल-खरडी श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे पोचणार आहे.श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सिध्दाप्पा हेब्बाळे (अध्यक्ष), सुरेश रावण (उपाध्यक्ष), सुभाष गायकवाड विणेकरी (खजिनदार), संचालक मलप्पा केसरकर, कलाप्पा गस्ती, रावसाहेब चोकांवी, रवि बामणे तसेच वारकरी सहभागी झाले आहेत. गावात ठिकठिकाणी भक्तगणांकडून पायी दिंडीचे सहर्ष स्वागत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *