
संकेश्वर (महंमद मोमीन) : झाडे लावा, झाडे जगवा हे फक्त सांगणे नको. प्रत्यक्षात झाडे लावून ते जगविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे प्राचार्या सौ. प्रियांका प्रशांत गडकरी यांनी सांगितले. येथील श्री दानम्मादेवी शिक्षण संस्था संचलित मदर्स टच किंडर गार्टन शाळेच्या वनमहोत्सव त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वनमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे एपीएमसीचे माजी अध्यक्ष प्रशांत उर्फ बाबासाहेब पाटील, नगरसेवक शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बसवंत अक्कतंगेरहाळ, प्रशांत गडकरी, प्राचार्या सौ. प्रियांका गडकरी यांचे हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशांत गडकरी यांनी भूषविले होते. प्राचार्या प्रियांका गडकरी पुढे म्हणाल्या, प्रत्येकांनी आपल्या घर परिसरात किमान एखाद्यं वृक्ष जगविण्याचे कार्य करायला हवे आहे. यावेळी नगरसेवक शिवानंद मुडशी म्हणाले, संकेश्वर बाजार समिती आवारात मदर्स टच शाळेचे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दिपा श्रीखंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिक्षिका प्रियांका देशपांडे यांनी करुन दिला. वनमहोत्सव कार्यक्रमात शाळेची मुले-मुली वृक्ष-वेलीच्या पोषाखात दिसली. कार्यक्रमात शाळेची मुले पालक सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta