संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सनसाईन शाळेच्या मुला-मुलींनी बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. मंदार हावळ, डॉ. स्मृती हावळ यांची भेट घेऊन डाॅक्टर्स डे च्या शुभेच्छा प्रदान केल्या. छोट्या दोस्तांनी डाॅ. मंदार हावळ यांना राष्ट्रीय वैद्य दिनाच्या शुभेच्छा प्रदान करताना स्वतः लिहिलेल्या डाॅक्टर्स डे ची संदेश सादर केली. यावेळी शाळेच्या शिक्षिकांनी मुलांना डॉक्टरांच्या कार्याची माहिती देऊन डाॅक्टर्स डे ची माहिती दिली. डाॅ.मंदार हावळ यांनी शालेय मुलांना पेन-पेन्सील भेट देऊन आभार मानले. डाॅक्टरांच्या इंजेक्शनला घाबरणारी मुले डाॅक्टरांशी संवाद साधताना दिसली. डाॅ. मंदार हावळ यांचे तपासणी कक्ष मुलांनी भरुन गेलेले दिसले.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …