संकेश्वर (महंमद मोमीन) : रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून डाॅटरांनी कार्य करायला हवे असल्याचे चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली यांनी सांगितले. ते संकेश्वर डॉ. रमेश दोडभंगी यांच्या विवेकानंद इस्पितळातील सत्काराचा स्विकार करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. रमेश दोडभंगी यांनी केले. डाॅ. राजेश नेरली पुढे म्हणाले, डॉ. रमेश दोडभंगी हे रुग्णाचे मनोधैर्य वाढवून औषधोपचार करतात. त्यामुळे विवेकानंद इस्पितळातील रुग्ण लवकर बरा होऊन घरी परततो. पूर्वीची वैद्यकीय सेवा आणि आजची वैद्यकीय सेवा यामध्ये जमीन आसमानाचा फरक असला तरी डाॅक्टरांनी रुग्ण सेवेचा वसा चालवितांना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायला हवे आहे. डाॅक्टरांनी रुग्णाला जगण्याची उमेद मिळवून देण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सांगून त्यांनी डाॅक्टर्स डे चे जनक डॉ. बी. सी. राय यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी डॉ. दोडभंगी यांनी संकेश्वरचे चार्टर्ड अकाॅंन्टंट शिवानंद कमते, सतीश लट्टी यांचा सन्मान करुन त्यांना सीए दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
“डाॅक्टर्स डे” विवेकानंद इस्पितळात मोफत आरोग्य तपासणी शिबिराने साजरा.
संकेश्वर विवेकानंद इस्पितळाचे
डॉ रमेश दोडभंगी यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराने डाॅक्टर्स डे साजरा केला. शिबिरात डॉ. दिपक बाळेकाई, डॉ. विवेक नाईकवाडी यांनी सहभागी होऊन ११० रुग्णांची तपासणी करुन सल्ला दिला. शिबिरात शुगर (मधुमेह) बीपी (उच्च रक्तदाब) ईसीजी, २-डी इको, श्वासकोश, कोलेस्टेरॉल, थाॅयराईडची मोफत तपासणी करण्यात आली. याचा लाभ बहुसंख्य रुगणांनी घेतला.
यावेळी डॉ. चंद्रकांत पाटील, चार्टर्ड अकाॅंन्टंट शिवानंद कमते, सतीश लट्टी, नगरसेवक रोहण नेसरी, मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, सचिन सपाटे, अनेक मान्यवर उपस्थित होते.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …