चिल्लर पैशांच्या व्यवहारातून प्राणघातक हल्ला
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी १२ वाजता वडर गल्लीत दोस्तांने ब्लेडने दोघा दोस्तांचा गळा चिरल्याची घटना घडली आहे. ब्लेडने गळा चिरल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याविषयी पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी लक्ष्मण परशराम वड्डर (वय २४) राहणार वडर गल्ली संकेश्वर याने देवदास प्रकाश हुदले याला उसणवारीने पैसे दिले होते. लक्ष्मणने पैसांचा तगादा लावल्याने आज देवदास हुदले यांनी रागाच्या भरात लक्ष्मण परशराम वड्डर (वय २४), संतोष शंकर वड्डर (वय २३) दोघे राहणार वडर गल्ली संकेश्वर यांच्यावर ब्लेडने गळ्यावर सपासपा वार करुन प्राणघातक हल्ला केला आहे. ब्लेडच्या घावाने गंभीर जखमी झालेले लक्ष्मण आणि संतोष याला लागलीच उपचारासाठी बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी लागलीच हल्लेखोर आरोपी देवदास हुदले याला अटक करुन कसून चौकशी चालविली आहे. संकेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta