Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वरात रस्त्यांची वाट लागलीयं….!

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील बरेच रस्ते पावसाच्या पाण्याने उखडलेले दिसताहेत. बऱ्याच रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी तसेच ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांत पावसाचे पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील अंबिका नगरला जाणारा रस्ता चांगलाच गैरसोयीचा बनलेला दिसत आहे. येथे गटारीची व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहताना दिसत आहे. येथील खड्डेमय रस्त्यात पावसाचे पाणी साचून राहिल्याने शाळकरी मुले, शेतकरी आणि येथील नागरिकांंची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. शाळकरी मुले, शेतकरी रस्त्यातील खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यतून ये-जा करत आहेत. नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक शेवंता कब्बूरी यांनी इकडे लक्ष देऊन रस्त्यावर किमान मुरुम टाकून लोकांची गैरसोय दूर करण्या्ची मागणी अंबिका नगर येथील नागरिकांतून केली जात आहे. येथील प्रभाग तीन मधील मड्डी गल्ली ते पी. बी. रोडला जोडणारा शिवनेरी व्यापारी संकुलातील रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. याचमार्गे शालेय मुला-मुलींचे तसेच लोकांचे जादातर ये-जा असल्याने त्यांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. शिवनेरी व्यापारी संकुलात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची सोय नसल्याने रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. या प्रभागात तीन नगरसेवक कार्यरत असून त्यांचे इकडे लक्ष दिसेनासे झाले आहे. पावसाळ्यापूर्वी गावातील कांहीं रस्त्यांचे पॅचवर्क काम झाल्याने तेथे खड्ड्यांची समस्या दिसेनाशी झाली आहे. निडसोसी रस्ता, अंबिका नगरला जाणारा रस्ता, शिवनेरी व्यापारी संकुलातील मार्ग हे समस्यांचे ठिकाण बनलेले दिसत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांनी गावात पहाणी करुन समस्या सोडविण्याचे काम करावे, अशी मागणी लोकांतून केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *