संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांना आज विचित्र हवामानाचा अनुभव घेता आला. सकाळी पावसाच्या तुरळक सरी, दुपारी उन्हाच्या काहिलीने लोकांना परेशान केले अन् सायंकाळी विजांच्या कडकडाटातसह तुरळक पाऊस बरसला. आजच्या विचित्र हवामानाची लोकांत चांगलीच चर्चा केली जात आहे. तरण्या पावसानंतर पुष्य नक्षत्र काळात बरसणाऱ्या म्हातारा पावसाची एंट्री संथगतीने झालेली दिसत आहे. शेतकऱ्यांनी म्हातारा काठी टेकणार असा अंदाज बांधता होता पण तो फोल ठरलेला दिसत आहे. म्हाताऱ्याची चाल अगदी संथगतीने चालल्यामुळे तुरळक पावसाने म्हातारा निरोप घेणार असल्याचे लोकांतून सांगितले जात आहे. तुरळक पावसामुळे खरीपात किडीचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांंना खरीपात किटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. खरीप पिकांत निर्माण झालेला किडीचा प्रादुर्भाव खरीपाच्या उत्पादनावर परिणामकारक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta