Tuesday , March 3 2026
Breaking News

खणदाळ येथे उद्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : खणदाळ तालुका गडहिंग्लज येथील अण्णाभाऊ साठे मित्र मंडळातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती सोमवार दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गजानन घोडके सरपंच, विजय शेरवी, ईरप्पा हसूरी, गंगाधर हसकोटी, चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी, ग्रामपंचायत सदस्य सुजित पाटील, उद्योजक बसवराज दोडमनी, राहुल देसाई, दलित संघटनेचे नेते संतोष सत्यनाईक, पोलिस पाटील जोतिबा परीट, शशिकांत पाटील (खातेदार), ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे सुनिल दावणे, महेश दावणे यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *