
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. गडहिंग्लज येथ नुकतेच खुल्या पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी सहभागी होऊन यश मिळवले आहे. सर्व विजेत्या स्केटिंगपटूंचे अकॅडमीच्या अध्यक्षा सौ. संगिता कल्याणकुमार निलाज यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. त्यांनी स्केटरना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. इनलाईन, क्वाड व टेनासीटी. 500 मी. स्पर्धेत प्रितम निलाज, विभुता पट्टणशेट्टी, आरोही शिलेदार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. महमद मुल्तानी द्वीतीय क्रमांक कनिष्ठ गटात राही निलाज वीर मोकाशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कृष्णा बस्तवाडी (तृतिय क्रमांक) स्वराज सपाटे, श्रेयश सुंनदाळे (द्वितीय क्रमांक) कार्तिक मोकाशी, अभय नंदिहळ्ळी यांनी (तृतीय क्रमांक) मिळविला आहे. विजेत्या
सर्व स्केटरना प्रशिक्षक अजितसिंग शिलेदार यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभले आहे. विजेत्या स्पर्धेकांचे विशेष अभिनंदन कल्याणकुमार निलाज, सचिन सपाटे, कुमार बस्तवाडी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta