Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात नागपंचमी उत्साहात साजरी

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात घरोघरी मातीच्या नागांची पूजा करुन नागपंचमी उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली‌‌. श्रावणातील पहिला सण नागपंचमी परंपरागत पद्धतीने संकेश्वर परिसरात भक्तीमय वातावरणात सर्वत्र साजरा होतांना दिसला. येथील नाग देवता मंदिरात अभिषेक, महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वरातील कांही नागदेवता मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आली होती. आजच्या धावपळीच्या जीवनात एकीकडे सण उत्सवांचे महत्व कमी होतांना दिसत असतांना दुसरीकडे सण समारंभातील परंपरा देखील कालबाह्य होताना दिसत आहेत. संकेश्वरात नागपंचमीतील झोपाळ्यावरील झोके शोधून देखील पहावयास मिळाले नाहीत. त्याचप्रमाणे यंदा बाजारात रेडिमेड लाह्या विक्रीसाठी उपलब्ध दिसल्या. चिनमूरे भट्टीवर लाह्या भाजणे बंद झाल्याने महिलांना रेडिमेड लाह्याच खरेदी कराव्या लागल्या. येथील आशापूरा बेकरी, बिकानेर बेकरी तसेच गावातील कांही दुकानात रेडिमेड फराळाची विक्री होताना दिसली. शंकर नगर येथील मल्लीकार्जुन येळोती यांच्या शेतवाडीतील नागदेवता मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आलेली पहावयास मिळाली.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *