
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी तालुका मार्केटिंग सोसायटी प्रगतीपथावर असून चालू आर्थिक वर्षात सोसायटीला २७ लाख रुपये नफा झाल्याचे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. सोसायटीतर्फे आयोजित नूतन मालवाहू ट्रक पूजन कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते. सोसायटीने नव्याने खरेदी केलेल्या दोन मालवाहू ट्रकची पूजा माजी खासदार रमेश कत्ती, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सोसायटीचे अध्यक्ष कलण्णा चौगुला, उपाध्यक्ष के. डी. पाटील, संचालक सुनिल पर्वतराव, नंदू मुडशी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
रमेश कत्ती पुढे म्हणाले, तालुका मार्केटिंग सोसायटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सोसायटीची वार्षिक उलाढाल ६ कोटी रुपयांची असून सोसायटीला चालू आर्थिक वर्षात २७ लाख रुपये नफा झाला आहे.सोसायटीकडे स्वतःच्या मालकीची अकरा मालवाहू ट्रक असून सोसायटीला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य संचालक मंडळ प्रमाणिकपणे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशांत पाटील, गिरीशगौडा पाटील, अभिजित कुरणकर, संतोष हतनुरी, कुमार बस्तवाडी, संतोष कमनुरी, आनंद संसुध्दी, नगरसेवक हारुण मुल्ला, ॲड. संतोष नेसरी, चेतन बशेट्टी, सागर जकाते, प्रदीप माणगांवी सोसायटीचे संचालक अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta