संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी एक मारुती ओम्नी कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.
बस स्थानकाजवळ येताच कारमधून धूर येत असल्याचे दिसत होते. लागलीच गाडीतील सर्व प्रवासी बाहेर पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नागरिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
सदर आग गाडीत लावण्यात आलेल्या गॅस किटच्या गळतीमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta