संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील मोहरम हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजले जाते. त्यामुळे मोहरम सणात सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात. मोहरम शांततामय आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले. संकेश्वर पोलिस ठाण्यात आज सायंकाळी मोहरम निमित्त शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्षस्थान नगरसेवक विनोद नाईक यांनी भूषविले होते. पीएसआय गणपती कोगनोळी पुढे म्हणाले, संकेश्वर शांतताप्रिय गाव राहिले आहे. त्यामुळे येथे सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. मोहरम सण शांततामय वातावरणात साजरा करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी पीर-पंजे प्रतिष्ठापना केलेल्या लोकांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले. सभेत संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकांनदार म्हणाले, मोहरम सणांत सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात त्यामुळे मोहरम शांततामय वातावरणात निश्चितच साजरा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत पीरपंजे ताजिया मिरवणुकीचा मार्ग पूर्ववत असल्याचे सांगण्यात आले. मोहरमची सातवी शनिवारी आणि सोमवार दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी कत्तल रात्र आणि मंगळवार दि. 9ऑगस्ट 2022 रोजी ताजिया (ताबूत) विसर्जन मिरवणूक सायंकाळी ४ ते ९.३० वाजता काढण्यास अनुमती देण्यात आली आहे. पीरपंजे ताबूत मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरास सहमती दर्शवण्यात आली आहे. सभेला मुस्तफा मकांनदार रियाज फणीबंद, अन्वर मुल्ला, फकरुद्दीन मुल्ला, पीरपंजे ताजिया मानकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta