
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये जडीबुटी दिन साजरा करण्यात आला. जडीबुटीचे जनक पूज्य आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिवस जडीबुटी दिन म्हणून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तुळशीच्या रोपाला जलार्पणांने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुरेखा शेंडगे उपस्थित होत्या. त्यांनी जडीबुटी अनेक सामान्य आणि असाध्य रोगांवर रामबाण उपाय असल्याचे सांगितले. यावेळी योगशिक्षक परशराम कुरबेट, पुष्पराज माने, आप्पासाहेब पाटील, रावसाहेब कंबळकर, नागराज नाईक, श्रीनिवास कोळेकर, शिवलीला कुंभार, मीनाक्षी सांबरेकर, विजयालक्ष्मी ढंग, गीता काकडे, संगीता मॅडम, गीता हेदुरशेट्टी व योगसाधक उपस्थित होते. उपस्थितांना तुळशी, लोळसुर, अमृतबळी खाऊच्या पानांची रोपे वाटण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लाप्पा कुरबेटी यांनी केले. आभार शैलजा जेरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta