
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली गावातील सर्व २३ प्रभागातील प्रमुख मार्गे काढली जाणार असल्याचे मुख्याधिकारी आर सी चौगुला यांनी सांगितले. आज पालिका सभागृहात हर घर तिरंगा विषयी नगरसेवकांची सभा घेण्यात आली. त्यात मुख्याधिकारींनी बाईक रॅलींची माहिती दिली. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी भूषविले होते. सभेत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे म्हणाले, संकेश्वरातील सर्व घरांवर तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य निश्चिततपणे केले जाणार आहे. संकेश्वरकरांनी ध्वजसंहितेच्या नियमानुसार आप-आपल्या घरांवर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत तिरंगा ध्वज फडकाविणेचे कार्य करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, सचिन भोपळे डॉ. मंदार हावळ, रोहण नेसरी, विवेक क्वळी यांनी आपले विचार मांडले. सभेला नंदू मुडशी, ॲड. प्रमोद होसमनी, पिंटू परीट, प्रशांत कोळी महेश सुगते उपस्थित होते.
हिरण्यकेशी गंगा पूजन आणि बाईक रॅली….
संकेश्वर पालिकेचे सर्व सदस्य बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी हिरण्यकेशी नदीच्या पाण्याचे गंगा पूजन करुन संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून हर घर तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करणार आहेत. बाईक रॅली सर्व २३ प्रभागातील प्रमुख मार्गे काढली जाणार आहे. रॅलीत गावातील नागरिकांना, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभागी होता येणार आहे.
सभेला सर्व नगरसेविकांची दांडी…
देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्यासाठी पालिकेने आयोजित केलेल्या सभेला सर्व महिला सदस्यांनी दांडी मारलेली दिसली. कांही नगरसेविकांनी सभेला उपस्थित राहण्यासाठी आपल्या पतीदेवास पाठविलेले दिसले. त्याचबरोबर आजच्या सभेला उपनगराध्यक्ष अजित करजगी यांच्यासह १७ सदस्य गैरहजर राहिलेले दिसले.
Belgaum Varta Belgaum Varta