सकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गेल्या तीन दिवसांपासून आश्लेषा (आसळकाचा) पाऊस संततधार बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले दिसत आहे. पावसाची दिवसरात्र संततधार चालू असल्याने सर्वसामान्य लोक, कष्टकरी शेतकरी, किरकोळ व्यापारी, फेरीवाले आर्थिक अडचणींचा सामना करताना दिसत आहेत. संततधार वृष्टीने शेतकऱ्यांच्या कामला ब्रेक मिळालेला दिसत आहे. गावातील बरेच रस्ते पावसाने उखडल्याने पादचारी लोकांची, वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत बरसलेल्या पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसत आहे. संकेश्वर नदी गल्ली ते नांगनूर गावाला जोडणारा हिरण्यकेशी नदीवरील पूल पाण्याखाली आलेला दिसत आहे. आश्लेषा पाऊस आणखी तीन-चार दिवस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हिरण्यकेशीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतशिवारात आणि सखल भागात पावसाचे पाणी साचून राहिलेले चित्र पहावयास मिळत आहे. यंदा गंगा-गौरी ओढा खळाळून वाहिलेला नसल्याने ओढ्यातील केरकचरा आणि झुडुपे बेफाम वाढलेली दिसत आहेत.
मोहरम सणात पावसाचा व्यत्यय..
यंदा कोरोनाचे सर्व नियम शिथिल करण्यात आल्यामुळे मुस्लिम बांधवांनी मोहरम सणाची सुरुवात पीरपंजे, ताजिया प्रतिष्ठापना केली आहे. संततधार पाऊस मोहरम सणांत मोठा अडथळा निर्माण करणारा ठरलेला दिसत आहे. भर पावसातच हिंदू-मुस्लिम बांधव पीरपंजे, ताजिया प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी जाऊन पीराला मलिदा, चोंगे नारळ, साखरेचा नैवेद्य दाखवून पिराचे दर्शन घेतानचे चित्र पहावयास मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta