
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोस्ट कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. घरावर फडकविणेच्या तिरंगा ध्वजाचे २५ रुपये शुल्क आकारले जात आहे. पोस्टात उपलब्ध तिरंगा ध्वज पाॅलिस्टरचे आहेत. संकेश्वर पोस्ट कार्यालयात दोन हजार तिरंगा विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती पोस्ट अधिकारी दयानंद कंचगारट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, संकेश्वर भागातील पोस्ट कार्यालयांना तिरंगा ध्वज संकेश्वर पोस्ट कार्यालयातून पुरविले जाणार आहेत. लोकांच्या सोयीसाठी संकेश्वर पोस्ट कार्यालयाने ऑनलाईन तिरंगा बुकींग सुरू केली आहे. ऑनलाईन बुकींग करणाऱ्या लोकांना पोस्टामार्फत तिरंगा घरपोच केले जाणार आहे.
पोस्टात दोन कोटी तिरंगा ध्वज उपलब्ध..
धारवाडचे पोस्ट मास्टर ॲण्ड जनरल डाॅ. एन. विनोदकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भारत सरकार पोस्ट विभागाला दोन कोटी तिरंगा ध्वज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे लोकांना पोस्टातून तिरंगा ध्वज खरेदी करता येणार आहे. पोस्ट कार्यालयाने लोकांच्या सोयीसाठी तिरंगा ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू केली आहे. त्याचा लाभ लोकांनी घ्यावयाचा आहे. तिरंगा ऑनलाईन बुकींग करणाऱ्या लोकांना पोस्टामार्फत तिरंगा घरपोच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta