
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-निडसोसी रस्त्यावरील कोळळगुत्ती डोंगर माथ्यावर वसलेल्या श्री बसवेश्वर,श्री बिरेश्वर देवस्थानची श्रावणी यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कोळळगुत्ती देवस्थानची यात्रा भरते. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कोळळगुत्ती डोंगरावरील श्री बसवेश्वर श्री बिरेश्वर देवाला अभिषेक करण्यात आला. यात्रोत्सवात यंदा निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींना कांहीं अपरिहार्य कारणास्तव सहभागी होता आले नाही. त्यामुळे गुळेदगुड्ड श्री गुरुसिध्देश्वर मठाचे श्री शिवशरण देवरु यांचे धार्मिक प्रवचन झाले. श्रींची पादपूजा सौ व श्री रविगौडा मलगौडा पाटील यांनी केली. भक्तांच्या सोयीसाठी कलगौडा पाटील यांनी डोंगरमाथ्यावर पत्र्याचे शेड उभारले आहे. कोळळगुत्ती डोंगरमाथ्यावर देवदर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. कोळळगुत्ती देवस्थान कमिटीतर्फे यात्रेनिमित्त महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादचा लाभ असंख्य भक्तगणांनी घेतला. यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब कोनकेरी, बसवाणी बाडकर, प्रकाश कमते, रावसाहेब कानडा, रितेश पोवार, शिवाजी आजरेकर, संजय फुंडे, प्रलेश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रोत्सवात भाजपाचे युवानेते सचिन सपाटे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta