Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर पालिकेतर्फे हिरण्यकेशीचे गंगा पूजन

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज हिरण्यकेशी नदीच्या नव्या पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले.संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हिरण्यकेशी गंगा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. पुरोहित संतोष जोशी यांच्या मंत्रोच्चारात नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांनी हिरण्यकेशीचे गंगा पूजन केले. गेल्या पाच दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. हिरण्यकेशीच्या पाण्याने मठाच्या पायरी पर्यंत शिरकाव केलेला दिसत आहे. मठाच्या पायरी जवळ गंगा पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गंगा पूजन कार्यक्रमात उपनगराध्यक्ष अजित करजगी सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, विवेक क्वळी, सचिन भोपळे, उद्योजक अभिजित कुरणकर, दुनडप्पा वाळकी, आणप्पा संगाई, प्रदीप माणगांवी, महेश सुगते, गणपा पाटील, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *