
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला चालना दिली. नगरसेवकांची बाईक रॅली सर्व प्रभागात “हर घर तिरंगा” चा संदेश घेऊन पोचलेली दिसली. नगरसेवक हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देत बाईक रॅलीत सहभागी दिसले. नगरसेवक भरपावसात बाईक रॅलीचा मार्गावर घोषणा देत पुढे सरकताना दिसले. बाईक रॅलीत माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, ॲड. प्रमोद होसमनी, चिदानंद कर्देण्णावर, जितेंद्र मरडी, सचिन भोपळे, विवेक क्वळी, हारुण मुल्ला, नंदू मुडशी, रोहण नेसरी, उद्योजक अभिजित कुरणकर, प्रदीप माणगांवी, सचिन सपाटे, दत्ता दवडते, किरण किंवडा, संदिप गंजी, अप्पा शिंत्रे, दत्ता शिंदे, दुंडप्पा वाळकी, कुमार कब्बूरी, प्रशांत कोळी, संदिप दवडते पोलिस अधिकारी तसेच मुख्याधिकारी आर. सी. चौगुला पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta