
संकेश्वर (महंमद मोमीन) : गजकर्ण सौहार्द सहकारी संस्थेने सभासदांचे विश्वास संपादन केल्याचे चार्टर्ड अकाऊंटंट शिवानंद कमते यांनी सांगितले. ते गजकर्ण सौहार्द सहकारी संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोरगांवी यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सुहासिनी बोरगांवी यांनी केले.
अहवाल वाचन संतोष हुगार यांनी केले. गजकर्ण सौहार्द सहकारी संस्थेतर्फे चार्टर्ड अकाऊंटंट शिवानंद कमते, अॅड. श्रीमती प्रेमा करजगी, सिव्हिल इंजिनिअर सुनिल ओतारी यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोरगांवी, सौ. सुहासिनी बोरगांवी, देवदास भोसले यांचे हस्ते करण्यात आले. शिवानंद कमते पुढे म्हणाले, गजकर्णचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बोरगांवी ध्येयपूर्तीसाठी झटणारे आहेत. त्यांनी अल्पावधीत संस्थेची केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सभेला संचालक निजलिंगप्पा पिंपळगांवी, रमेश साळुंखे, विरुपाक्षी डोनवाडे,मलिकसाहेब मुल्तानी, सुधीर कुलकर्णी, अप्पासाहेब जकाती, कलाप्पा तेली, रविंद्र घाटगे, दुंडप्पा किंवडा, प्रशांत शापूरे, जाकीरहुसेन पाटील, सौ. विद्यावती जी हिरेमठ, अप्पू सुमारे, विजय कुरबेट, मुस्ताक नदाफ संस्थेचे संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन प्रा. श्रीशैल्य मठपती यांनी केले
Belgaum Varta Belgaum Varta