
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज नगरसेवकांनी देशप्रेमी युवकांनी हर घर तिरंगा अभियांतर्गत आठ हजार तिरंगा ध्वज, कत्ती सावकारांनी जिलेबी भेट घरपोच करण्याचे कार्य केले. आज सकाळपासून घरोघरी तिरंगा ध्वज पोचविण्याचे कार्य जोमात होतांना दिसले. संकेश्वर पालिका आणि राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती यांच्या सौजन्याने संकेश्वरकरांना निःशुल्क तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक देण्यात आले. हर घर तिरंगा अभियानात सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, चिदानंद कर्देण्णावर, नंदू मुडशी, डॉ. मंदार हावळ, रोहण नेसरी, सचिन भोपळे, विवेक क्वळी, हारुण मुल्ला, माजी नगरसेवक पिंटू परीट, दिपक भिसे, नारायण कदम, देशप्रेमी युवक जयप्रकाश सावंत, संदिप दवडते, सचिन सपाटे, विकास ढंगे, संतोष सत्यनाईक सुधीर पाटील, उमेश फडी, विजय जरळी, दुंडाप्पा वाळकी, सागर कर्देण्णावर, विष्णू जाधव, शाम यादव, आनंद संसुध्दी, गजानन मोकाशी, बबलू मुडशी, अभिजित कुरणकर, प्रकाश इंगळे, संग्राम कदम, बसगौडा पाटील, जयवंत करीगारसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संकेश्वरात हर घर तिरंगा…
संकेश्वरातील सर्व २३ प्रभागातील नगरसेवकांनी जबाबदारीपूर्वक प्रत्येक नागरिकांना घरांवर फडकविणेचा तिरंगा ध्वज, सोबत कत्ती सावकारांची जिलेबी भेट घरपोच करण्याचे कार्य पार पाडलेले दिसले. त्यामुळे संकेश्वरकरांत आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले. कांही लोकांनी आजचं आपल्या घरांवर तिरंगा डौलाने फडकविलेले चित्र पहावयास मिळाले. बऱ्याच दुचाकीवर तिरंगा डौलाने फडकतांना दिसला.संकेश्वरात आझादी का अमृतमहोत्सव सोहळ्याची शानदार सुरुवात झालेली पहावयास मिळाली.
Belgaum Varta Belgaum Varta