
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरात गेल्या ४८ तासांत बरसलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी दूथडी भरुन वाहत असून नदीवरील संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आलेला दिसत आहे. संकेश्वरच्या हाकेवर महाराष्ट्रातील नांगनूर गाव वसलेले असल्याने हिरण्यकेशी नदीवर संकेश्वर नदी गल्ली ते नांगनूर गावाला जोडणारा ब्रिज उभारण्याचे काम राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी केले आहे. हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊन संकेश्वर-नांगनूर ब्रिज पाण्याखाली आल्याने आता संकेश्वर-नांगनूरचा संपर्क तुटलेला दिसताहे. संकेश्वर गाव सिमेवर वसलेले असल्याने व्यापार व्यवसायनिमित्ताने लगतच्या महाराष्ट्र राज्यातील नांगनूर गावकऱ्यांचे सतत संकेश्वरला येणे-जाणे सुरु असते. ही गोष्ट लक्षात घेऊन मंत्री उमेश कत्तीं यांनी संकेश्वर व्यापारवृध्दीसाठी सदर ब्रिज उभारण्याचे काम केले आहे. सदर ब्रिजचा प्रस्ताव प्रथम सरकारकडे लोकायुक्त सुभाष आडी यांनी मांडल्याचा निर्वाळा माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ब्रिजचे श्रेय कोणाला? हा वादग्रस्त मुद्दा सतत भाषणातून मांडला जात आहे.
नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा…
हिरण्यकेशी नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना संततधार पावसाची भीती लागून राहिलेली दिसत आहे. हिरण्यकेशीचे पाणी ढोर गल्लीच्या जवळपास पोहचलेले दिसत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हिरण्यकेशीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta