
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आझादी का अमृतमहोत्सव घरोघरी “तिरंगा ध्वज “डौलाने फडकावित सर्वत्र उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करतांना संकेश्वरकरांत मोठा देशाभिमान पहावयास मिळाला. संकेश्वर पालिका आणि हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सौजन्याने संकेश्वरकरांना निःशुल्क तिरंगा सोबत कत्ती सावकारांची जिलेबी बाॅक्स घरपोच करण्याचे कार्य पालिकां सदस्यांनी केले. त्यामुळे संकेश्वरकरांना तिरंगा ध्वज मिठाई बाजारातून खरेदी करावी लागली नाही. संकेश्वरातील बऱ्याच लोकांना ध्वजसंहितेचे नियम माहित नसल्यामुळे आपापल्या परीने लोकांनी तिरंगा फडकविणेचे कार्य केलेले पहावयास मिळाले.
घरांवर तिरंगा फडकविण्याची सुवर्णसंधी..
अंबिका नगर येथील युवा नेते महेश दवडते यांनी आपल्या घरात आझादी का अमृतमहोत्सव उत्साही वातावरणात साजरा केला. माजी सैनिक गोपाळ मगदूम यांनी भारतमाता प्रतिमेचे पूजन करुन दवडते यांच्या घरावर ध्वजारोहण केले. यावेळी महेश दवडते यांनी माजी सैनिक गोपाळ मगदूम, अंगणवाडी सेविका नियामत मोमीन यांचा सत्कार केला.
यावेळी शिवपूत्र आरभांवी, शिवा बेळवी, अमोल गोंधळी, रवि दवडते, संदिप गोंधळी, कृष्णा दवडते, राजू मनवाडे, पांडूदादा दवडते, झाकीर मोमीन, संदिप देसाई, अवधूत पटवेगार, संजय गोंधळी सागर दवडते उपस्थित होते.
रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे ध्वजारोहण..

येथील रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलतर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील ध्वजारोहण बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ यांनी केले. यावेळी डॉ. सुरेखा हावळ, डॉ. स्मृती हावळ, डॉ. सुप्रिया हावळ, डॉ. मंदार हावळ, डॉ. प्रितम हावळ, जयप्रकाश सावंत आणि हाॅस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta