
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेचे ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आले. कोरोना काळात उत्तम सेवा बजाविलेल्या सफाई कामगारांना कर्नाटक सरकारतर्फे देण्यात आलेले प्रमाणपत्र उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सचिन भोपळे, नंदू मुडशी, चिदानंद कर्देण्णावर, रोहण नेसरी, विवेक क्वळी, ॲड. प्रमोद होसमनी यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी युवानेते कुमार कब्बूरी, बसगौडा पाटील, दुंडाप्पा वाळकी, प्रशांत कोळी, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद पालिका कर्मचारी शालेय मुले उपस्थित होते.
गावात सर्वत्र अमृतमहोत्सव साजरा..
संकेश्वरात आझादी का अमृतमहोत्सव सोहळा गावातील शासकीय, निम शासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालये, सहकारी संघ संस्थांवर ध्वजारोहण करुन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. गावात घरांवर, दुकानावर तिरंगा डौलाने फडकतांना दिसला. दुचाकी चारचाकी वाहने, ॲटोरिक्षावर तिरंगा लावून वाहनधारकांनी लोकांत देशाभिमान जागविण्याचे कार्य केले. येथील तालुका मार्केटिंग सोसायटीचे ध्वजारोहण संचालक शिवानंद मुडशी यांनी केले. संकेश्वरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस आझादी का अमृतमहोत्सव सोहळा विविध भरगच्च कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta