
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी येथील साई इंटरप्राईजेसने हर घर तिरंगा अभियानात २५०० तिरंगा ध्वजांची निर्मिती करुन आपला सहभाग दर्शविला आहे. भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा आझादी का अमृतमहोत्सव म्हणून देशभर साजरा केला जात आहे. आझादी का अमृतमहोत्सव सोहळा हर घर तिरंगा फडकावून उत्साही वातावरणात साजरा करण्याचे श्रेय तिरंगा ध्वज निर्मिती करणाऱ्यांना हातांना द्यावे लागेल. घरोघरी डौलाने फडकत असलेल्या तिरंगा ध्वजांत संकेश्वर साई इंटरप्राईजेसने तयार केलेले ध्वज समाविष्ट व्हावे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे साई इंटरप्राईजेसचे मालक सुहास कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले साई इंटरप्राईजेसला हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाल्याने मोठा आनंद झाला आहे. शेवटच्या क्षणी आंमच्या गारमेंटला अडीच हजार तिरंगा ध्वज निर्मिती करण्याचे काम मिळाले. साई गारमेंटमधील शिलाई काम कररणाऱ्या महिलांनी तिरंगा ध्वज व्यवस्थितपणे तयार करुन देशसेवेच्या कार्यात आपल्या सहभाग दर्शविला आहे. आपले साई इंटरप्राईजेसने तिरंगा ध्वज वेळेत तयार करुन देण्याचे कार्य करुन दाखविलेचा सार्थ अभिमान वाटतो. गेली सात वर्षे झाली साई इंटरप्राईजेसने अत्यल्प दरात शालेय पोषाख निर्मितीचे काम चालविले आहे. शालेय पोषाख निर्मितीत साईचा नावलौकिक आहे. शाळा-महाविद्यालयीन इनिफार्म (पोषाख) उत्तम तयार करुन देण्यात साईचा हातखंड राहिला आहे. कोरोनाच्या काळात साई इंटरप्राईजेसने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मास्क बनवून देण्याचे कार्य केले आहे. वीस हजार मास्कची निर्मिती साईने करुन दाखविली आहे.
तिरंगा ध्वज खादी अन् पाॅलीस्टरचे
साई इंटरप्राईजेसने तयार केलेले तिरंगा ध्वज खादी अन पाॅलिस्टरचे आहेत. तिरंगा निर्मितीचे कार्य ध्वजसंहितेच्या नियमानुसार करुन देण्यात आले आहे. तिरंगा वेळेत तयार करुन देण्याच्या कामाचे श्रेय आपल्या गारमेंटमधील शिलाई काम करणाऱ्या महिलांना द्यावे लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta