
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर घटक काॅंग्रेसच्या वतीने आझादी का अमृतमहोत्सव निमित्त गावातील प्रमुख मार्गे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. बोलो भारत माता की जयच्या जयघोषाना देत बाईक रॅली मार्गाक्रम होताना दिसली. बाईक रॅलीला माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे मार्गदर्शन आणि संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांचे नेतृत्व लाभले होते. संकेश्वर चन्नम्मा सर्कल येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. चन्नम्मा सर्कल ते गावातील प्रमुख मार्गे रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीत माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सहभागी होऊन काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे कार्य केले. संकेश्वरात बाईक रॅलीने मार्गक्रमण केले. नंतर कणगला जिल्हा पंचायत मतक्षेत्रात रॅली पोहचलेली दिसली. बाईक रॅलीत नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, काॅंग्रेसचे युवानेते अविनाश नलवडे, दिलीप होसमनी, प्रशांत कोळी कुमार कब्बूरी, संतोष सत्यनाईक, रियाज फणीबंद, मुस्तफा मकांनदार, तबरेज हजरतभाई, युवराज पात्रोट काॅंग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. संकेश्वर काॅंग्रेसने आझादी का अमृतमहोत्सव निमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन करुन युवा वर्गात देशाभिमान जागविण्याचे कार्य केलेले पहावयास मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta