संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मंगळवार दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च (एमबीए) काॅलेजतर्फे “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. विद्या स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, गेली सात वर्षे झाली “आरंभ” फेस्टने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळवून देण्याचे कार्य केले आहे. गेली दोन वर्षे झाली कोरोनामुळे आरंभ फेस्ट होऊ शकले नाही. यंदा आरंभ-२०२२ ने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध १२ स्पर्धांचे भव्य आयोजन केले आहे. यामध्ये ग्रुफ डान्स, सोलो डान्स, बिझनेस प्लॅन, बेस्ट मॅंनेजर, रांगोळी, सोशल मिडिया मास्टर, फोटोग्राफी, व्हिडिओ मेनिया क्वीझ, आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अदमासे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिंनी सहभागी होणार आहेत. पहिल्या बेंच ते शेवटच्या बेंचवरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचे कार्य आरंभने करुन दाखविले आहे. आमच्या अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चने उत्तम शिक्षणाबरोबर संस्कारसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य चालविले आहे. “आरंभ -२२” नॅशनल लेवल फेस्टच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ए आयएमआरचे चेअरमन विनयगौडा पाटील, कन्नड चित्रपट अभिनेते प्रविणकुमार गस्ती, शिक्षण संस्थेचे सचिव जी. सी. कोटगी, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला प्रा. संतोष तेरणीमठ, डॉ. प्रकाश कुंदरगी प्राध्यापक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta