
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी ध्वजारोहण करुन नवा इतिहास रचला आहे. मठाच्या इतिहासात प्रथमच भगव्या ध्वजाबरोबर तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य श्रींनी करुन दाखविले आहे. स्वातंत्रदिनी श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्रींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भक्तगणांनी अभिमानाने राष्ट्रगीत सादर केले. यावेळी श्री कपली महाराज, संजय जोशी, माजी नगरसेवक शिवानंद नेसरी, राजेंद्र कणगली, बसवराज बागलकोटी, सुहास कुलकर्णी, भरत नष्टी, राजू शिंदे, मठाचे व्यवस्थापक अर्जुन कानवडे, गणपा पाटील, महेश नेसरी, विरुपाक्ष मलकट्टी,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मठ-मंदिरावर तिरंगा….
पत्रकारांशी बोलताना श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी म्हणाले, आझादी का अमृतमहोत्सव सोहळा मठ मंदिर अशा धार्मिक स्थळांवर साजरा केला गेला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने भारतात आझादी का अमृतमहोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला जात आहे. प्रथम देश नंतर धर्म आहे. भारतीय नागरिकांत देशाभिमान जागविण्याचे कार्य आझादी का अमृतमहोत्सव सोहळ्यातून निश्चितच झाले आहे. आपण भारतीय असल्याचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवा आहे. मठात यावर्षीपासून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा आपण रुढ करीत असल्याचे श्रींनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta