
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेत एनसीसी छात्रांच्या शानदार पथसंचलनाने आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. एस.डी. हायस्कूल मैदानावर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी ध्वजारोहण केले. महाविद्यालयीन एनसीसी छात्रांनी शानदार पथसंचलन सादर केले. शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील पथसंचलनात आपला सहभाग दर्शविला शाळेच्या. छोट्या मुला-मुलींनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, अशा राष्ट्रपुरुषांच्या गणवेशात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.
यावेळी ए. बी. पाटील यांच्या हस्ते सेवानिवृत्त विंग कमांडर के. भालचंद्रंन, स्वातंत्र्य सैनिक मारुती दोडलिंगण्णावर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. जी. एस. इंडी, संचालक ॲड. आर. बी. पाटील, गंगाधर मुडशी, बसनगौडा पाटील, दयानंद केस्ती, विजय रवदी, विश्वनाथ तोडकर, शिक्षण संस्थेचे सचिव जी. सी. कोटगी, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी, नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, प्रशांत कोळी, कुमार कब्बूरी, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी, अविनाश नलवडे, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta