
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण विष्णू सुतार यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश सावंत यांच्या हस्ते विज्ञान प्रयोगशाळा कक्षाचे फित सोडून उद्घाटनन करण्यात आले. प्रोजेक्टर व चार्ट रुमचे उदघाटन एसडीएमसी अध्यक्ष प्रशांत कोपार्डे यांनी केले. विज्ञान प्रयोग सामुग्रीसाठी जयप्रकाश सावंत यांनी हातभार लावला असून तंत्रस्नेही शिक्षणासाठी प्रशांत कोपार्डे यांनी प्रोजेक्टर भेट स्वरुपात दिले आहे. सतीश नाईक यांनी शालेय मुलांना टाय व बेल्ट दिले आहे. देशाच्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. विजेत्या मुलांना शैक्षणिक साहित्य बक्षिस स्वरूपात देण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी विक्रम घाटगे (पट्टणकुडी) यांनी वह्या, पेन वाटप केले.
उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. आर. अंबुलकर यांनी केले. सूत्रसंचलन शिक्षिका श्रीमती शिरगांवी यांनी केले. आभार शिक्षिका तावदारे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी संदिप कांबळे, समीर मकानदार, सागर एकसंबी, दत्ता थोरवत, सुकांत बांबरे, रमेश पोवार, अनंत जोशी, प्रफुल्ल खटावकर, सम्राट टिक्के, रोहित कोपार्डे, पुरुषोत्तम पेंडसे, राजेंद्र शेलार, एसडीएमसी सदस्य, पालक, शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta